Tue, May 21, 2019 23:04होमपेज › Pune › किल्ले शिवनेरीवर मुलीची आत्महत्या

किल्ले शिवनेरीवर मुलीची आत्महत्या

Published On: Jun 15 2018 9:40AM | Last Updated: Jun 15 2018 11:37AMजुन्नर : वार्ताहर

जुन्नरलगतच्या पिंपळगाव सिद्धनाथ येथील 15 वर्षीय मुलीने गुरुवारी रात्री किल्ले शिवनेरीवरील पहिला दरवाजालगतच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली.

सुहानी रघुनाथ खंडागळे (वय 15, रा. पिंपळगाव सिद्धनाथ, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. गुरुवारी (दि.14) रात्री 12 वाजेनंतर ती आपल्या राहत्या घरामधून वडिलांची दुचाकी (एमएच 14 डब्लू 9426) घेऊन बाहेर पडली होती. शुक्रवारी पहाटे 5 वाजेदरम्यान तिच्या वडिलांना ती घरात नसल्याचे आढळून आल्याने ते आजूबाजूला तसेच गावात चौकशीकरिता गेले. परंतु ती कुठेही आढळून आली नाही. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर वनविभागातील सुनील मोधे, गणेश मोधे हे रात्रपाळीकरिता वॉचमन म्हणून होते.

पहाटे 5.30च्या दरम्यान किल्ल्यावरील पहिल्या दरवाजालगत मोबाइल लाईट चमकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते तेथे गेले असता आत्महत्येची घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने वनविभाग अधिकार्‍यांना माहिती दिली.  या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.   आत्महत्येची ही दुसरी घटना किल्ले शिवनेरीवर झाली असून, यामुळे जुन्नर परिसरात खळबळ उडाली आहे.