Wed, Nov 14, 2018 19:19होमपेज › Pune › ‘वोट के सौदागर‘ केंद्रीय मंत्र्यांकडून शरद पवारांचा खरपूस समाचार

‘महाराष्ट्रातील काही बडे नेते फक्त ‘वोट के सौदागर‘

Published On: Feb 04 2018 1:38PM | Last Updated: Feb 04 2018 1:38PMपुणे : प्रतिनिधी

तीन तलाक पद्धत संपुष्टात आणण्यासाठी केंद्र शासनाने पाऊल उचलले आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही बडे नेते फक्त ‘वोट के सौदागर‘ असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योजक मंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केला. पुण्यात सर्किट हाऊसला आयोजित पत्रकार परिषदेत सिंह बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे उपस्थित होते.

हल्लाबोल आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये शरद पवार यांनी तीन तलाक पद्धतीवर भाष्य करताना, तलाक कुराणाने दिलेला संदेश आहे. त्यामध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करु शकत नाही. असे म्हणत केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. त्यापार्श्‍वभुमीवर पवारांच्या वक्तव्यांचा निषेध करत सिंह यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. जगामध्ये तलाक पद्धतीचा कायदा २२ देशांनी संपुष्टात आणला आहे. मात्र, भारतातील काही राजकीय पक्ष तीन तलाक संपुष्टात न येण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेळोवेळी विरोध आणि आंदोलन करणार्‍या काही विरोधी पक्षामुळे मुस्लिम समाजातील महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभेत तीन तलाकचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. मात्र, राज्यसभेत कॉंग्रेसने पाठिंबा न दिल्यास त्यांचे दोन चेहरे जगासमोर येणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले