Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Pune › घायवळ टोळीच्या नीलेश गावडेला कोठडी

घायवळ टोळीच्या नीलेश गावडेला कोठडी

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

कुख्यात गुंड पप्पू गावडेची टिप देण्यासाठी गजा मारणे टोळीला मदत केल्याच्या संशयावरून एकाचा खून केल्याप्रकरणी नीलेश घायवळ टोळीतील साथीदाराला अटक करण्यात आली आहे. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

सचिन उर्फ राजू सुरेश कुंभार (38, रा. मु. पो. लवळे, ता. मुळशी जि. पुणे) याच्या खून प्रकरणी पप्पू गावडेचा भाऊ गुंड नीलेश हिरामण गावडे (33, रा. लवळे, ता. मुळशी) याला पोलिस कोठडी सुनावन्यात आली आहे. 

याप्रकरणी नीलेश श्रीपती शिंदे (33), मनोज उर्फ मॉन्टी देवराम भिलारे (27 रा. मुळशी), विशाल बाळासाहेब टकले (वरदायनी सोसायटी, पाषाण), ओंकार उर्फ चिक्या शाम फाटक (19, रा. कोथरूड), कुणाल कैलास कंधारे (21, रा. किशकिंदानगर, कोथरूड), दत्‍ता उर्फ बबलू बाळू मालपोटे (25, रा. भैरवनाथवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण सुरेश कुंभार (33, रा. लवळे, ता. मुळशी) यांनी याबाबत पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  प्रविण कुंभार यांचा भाऊ सचिन याचा दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लवळे येथे हिरामण गोठे यांच्या घराजवळ धारदार हत्यारांनी वार करून निर्घृण खून केला होता.

दाखल फिर्यादीनुसार, नीलेश गावडे हा मृत पप्पू गावडे याचा भाऊ असून तो नीलेश घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार होता. पप्पू गावडे हा कोठे आहे, याची टिप सचिन कुंभारने दिल्यानंतर पप्पू गावडेचा जमिनीच्या व्यवहारातून 2014 मध्ये गजा मारणे टोळीकडून  खून करण्यात आला होता. याचाच बदला म्हणून सचिन याचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  तपास करण्यासाठी सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी पोलिस कोठडी देण्याची नीलेश गावडेला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

Tags : pune, pune news, ghayavala Gang Partner, Nilesh Gawde arrested,