Wed, Feb 20, 2019 02:51होमपेज › Pune ›  गँगस्टर रवी पुजारीचा हस्तक निलेश भरमला पिस्तुलासह अटक

 गँगस्टर रवी पुजारीचा हस्तक निलेश भरमला पिस्तुलासह अटक

Published On: Feb 20 2018 2:42PM | Last Updated: Feb 20 2018 2:41PMपुणे : प्रतिनिधी

गँगस्टर रवी पुजारीचा हस्तक आणि सराईत गुन्हेगाराला पिस्‍तुलसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

 निलेश भरमवर खडक, स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोंढवा या पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, चोरी, खंडणी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मोक्क्याचा गुन्हा दाखल असून, यात तो गेल्याच महिन्यात जामीनावर सुटला आहे. 

निलेश भरम हा पिस्तुल घेऊन के. के. मार्वेट येथील पेट्रोलपंपाच्या मागे येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्‍यानंतर त्याला सापळा रचून अटक केली. निलेश हा रवी पुजारी टोळीचा सदस्य असून, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या जीवाला बापु नाईक टोळीच्या गुंडांकडून धोका आहे. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी त्याने धुळ्यावरून हे पिस्तुल घेतल्याचे समोर आले आहे. निलेशकडून पोलिसांनी एक पिस्तुल, सात काडतुस  आणि एक कार जप्त केली.