Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Pune › बारामती : कुख्यात गुंड 'छोटा विमल'चा खून 

बारामती : कुख्यात गुंड 'छोटा विमल'चा खून 

Published On: Jun 29 2018 9:56AM | Last Updated: Jun 29 2018 9:55AMबारामती : प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात लाकडी दांदक्याने मारहाण करत येथील कुख्यात गुंड अक्षय जमदाडे उर्फ छोटा विमल ( वय २०, रा. जळोची बारामती) याचा खून करण्यात आला. गुरुवारी ( दि. २८ ) मध्यरात्री शहराच्या जळोची भागात ही घटना घडली. 

छोटा विमलवर पुणे जिल्ह्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडे, लुटमारीने त्याने बारामती परिसरातील पोलिसांना जेरीस आणले होते. जळोचीतील देवकाते कुटुंबातील तरुणांबरोबर त्याचा गुरुवारी किरकोळ वाद झाला. त्यात दांडक्याने झालेल्या मारहाणीमुळे त्‍याचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी रात्रीतच धरपकड करत याप्रकरणी सहा जणाना ताब्यात घेतले आहे.