Tue, Apr 23, 2019 00:00होमपेज › Pune › पिंपरीत गुन्हेगारावर गोळीबार

पिंपरीत गुन्हेगारावर गोळीबार

Published On: Mar 20 2018 10:53AM | Last Updated: Mar 20 2018 10:53AMपिंपरी : प्रतिनिधी

वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रस्त्यावर गाडी पुढे मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका गुन्हेगारावर टोळक्याने गोळीबार केला आहे. यामध्ये जखमीला दोन गोळ्या लागल्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयवंत चितळकर हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिललेल्या माहितीनुसार चितळकर हा त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्यावेळी एक कार तेथून जात होती. मात्र रस्त्यावर दुचाकी असल्याने कारला अडचण होत असल्याने कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितल्‍याने त्यांच्यात वादावादी झाली. कार चालक निघून गेला आणि त्याच्या इतर साथीदाराना घेऊन आला. त्यावेळी मारामारी झाली आणि एकाने चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याला दोन गोळ्या लागल्याची शक्यता आहे. त्याच्यावर बिर्ला रुग्णालयात उवचार सुरू आहेत. तपास चिंचवड पोलिस करत आहेत.