Wed, Jan 22, 2020 21:48होमपेज › Pune › पुणे : आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज

पुणे : आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज

Published On: Sep 12 2019 2:40PM | Last Updated: Sep 12 2019 2:40PM
पुणे : प्रतिनिधी

गणेश भक्तांना वैद्यकिय मदत पुरविण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग, ससून रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून रुग्णवाहिकांचा ताफा अलका चौकात सज्ज करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या २, ससून रुग्णालय १ तर विघ्नहर्ता न्यासकडून १ अशा रुग्णवाहिका तातडीची सेवा देण्यास सज्ज आहेत. जर कोणाला तातडीच्या उपचारांची गरज पडली तर येथील रुग्णवाहिकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.