Mon, Aug 19, 2019 07:05



होमपेज › Pune › पुण्यात 10,234 कोटींच्या निधीचा, कर्नाटकात 73 टक्के मतदानाचा...

पुण्यात 10,234 कोटींच्या निधीचा, कर्नाटकात 73 टक्के मतदानाचा...

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:54AM



पुणे : प्रतिनिधी 

केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात होते. या वेळी पुणे शहर व जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याच्या, महत्त्वाच्या अनेक पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधीच्या घोषणा करण्यात आल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडला केंद्र सरकारकडून 10 हजार 234 कोटींचा निधी देण्याची घोषणा गडकरींनी केली. भूसंपादनासाठी रखडलेला संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी येत्या 31 मे पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकार्‍यांना दिले. देहू ते देहूरोड दरम्यानची संरक्षण विभागाच्या ताब्यातील जागेसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह संबंधितांची बैठक घेण्याची सूचना गडकरी यांनी केली. बंगळुरू महामार्गावरील वडगाव उड्डाण पुलापासून कात्रज चौकापर्यंत जुन्या बायपास रस्त्यावर सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याची घोषणाही गडकरी यांनी केली. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होईल. शिवसृष्टीसाठी या महामार्गावर सेवा रस्त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेशही ‘एनएचएआय’ला दिले. येऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 117 एकर जमिनीवर ड्रायपोर्ट (बंदर) उभारण्याच्या प्रस्तावालाही संमती देण्यात आली. एकीकडे पुण्यात घोषणांचा पाऊस पडत असताना दुसरीकडे कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानात 73% मतांचा पाऊस पडला.