Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Pune › पुणे : चांदणी चौकात तरुणाचा खून

पुणे : चांदणी चौकात तरुणाचा खून

Published On: Jul 10 2018 9:00AM | Last Updated: Jul 10 2018 9:00AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड भागातील चांदणी चौकातील कला ग्राम परिसरात पार्टीसाठी गेल्यानंतर किरकोळ वादातून मित्राचा चौघांनी बेदम मारहाण करत डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे.
अक्षय झोरी ( वय २१)  असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

झोरी आणि त्याचे इतर चार मित्र रात्री पार्टीसाठी बाहेर गेले होते. दरम्यान रात्री साडे तीन वाजता ते चांदणी चौकातील जैन लोहिया आयटी पार्कजवळ अक्षय व मित्रांचा किरकोळ वाद झाला. यातच चौघांनी अक्षयला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बाटली घातली. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण पसार झाला आहे.