Wed, Jul 17, 2019 00:36होमपेज › Pune › सुशील कुमार, बजरंग पुनीया, साक्षी मलिक तर विनेश फोगट यांना थेट तिकीट

'एशियन गेम्स'साठी महाराष्ट्राच्या राहुल आवारेची ट्रायल 

Published On: Jun 04 2018 10:46PM | Last Updated: Jun 04 2018 10:46PMपुणे : प्रतिनिधी

भारतीय कुस्ती महासंघाच्या कोअर टीमने आगामी एशियन गेम्स साठी चार पैलवानांना सरळ एशियाडचे तिकीट दिले आहे. यामध्ये पैलवान सुशील कुमार, बजरंग पुनीया, साक्षी मलिक व विनेश फोगट या चारही पैलवानांची निवड चाचणी न घेताच त्यांना सरळ एशियाड तिकीट देऊन प्रांतवादाच्या मुद्द्याला पुन्हा नव्याने तोंड फोडले आहे.

तर, महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तरी देखील आवारे याला निवड चाचणी द्यावी लागणार आहे. महाराष्ट्राच्याच पैलवानाला अशा प्रकारे चाचणी देवून जावे लागत आहे. तर उर्वरित या चार मल्लाना निवड चाचणी न देताच एशियाडची तिकीट देण्यात आली असल्याचे नवा वाद उफाळून आला आहे.

याबाबत राहुल आवारेचे प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार म्हणाले की, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मल्लाची ट्रायल न होता थेट प्रवेश देण्याचा नियम आहे. परंतु राहुलला ट्रायल साठी बोलावले आहे. महाराष्ट्रावर हा अन्याय आहे. याबाबत आगामी दोन दिवसात काय निर्णय होतो हे पाहून, पुढील भूमिका ठरवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.