Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Pune › बचत गटाच्या 110 महिलांची फसवणूक

बचत गटाच्या 110 महिलांची फसवणूक

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

बचत गटातील तब्बल 110 महिलांना इरसेड संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून चार टक्क्यांनी कर्ज देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये घेण्यात आले आहेत. याप्रकरणी चौघांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी प्रथमेश किरण कुलकर्णी (वय 26, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सतीश पंढरनीथ गुजरे, मंगेश वासुदेवराव वाकपंजर, खाडेश्‍वर मुरलीधर पाटील, कपील मल्लिकार्जुन गुरव (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इरसेड संस्थेकडून पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा यांसह इतर शहरांमधील बचत गटातील महिलांना व्यावसायासाठी कमी व्याजदरावर कर्ज देण्यात येतात. दरम्यान इरसेड संस्थेची कात्रज-कोंढवा रोडवर शाखा आहे. त्याठिकाणी आरोपी सतीश गुजरे हा शाखा अधिकारी, मंगेश वाकपंजर, खाडेश्‍वर पाटील, कपील गुरव हे लोन अधिकारी आहेत.

दरम्यान कात्रज भागातील बचत गटाच्या काही महिला शाखेत कर्जासाठी गेल्या होत्या.  त्यावेळी आरोपींनी संगनमत करून त्यांना दोन लाखांचे कर्ज मंजूर करून देण्यात येईल, असे सांगितले. त्यासाठी फॉर्म भरून घेण्यासाठी महिलांकडून 5 ते 10 हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही त्यांना कर्ज  दिले नाही. काही दिवसां कर्ज मिळत नसल्याने याबाबत चौकशी केली. त्यानंतर फिर्यादींना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता आरोपींनी एकूण 110 महिलांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 43 महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून 15 लाखांची फसवणूक  झाली.  तपास उपनिरीक्षक बी. एच. अहिवळे हे करीत आहेत. 

Tags : Pune, fraud, 110, women, savings, group