Wed, Nov 21, 2018 13:16होमपेज › Pune › बिट् कॉइनमध्ये आठ पुणेकरांना चुना

बिट् कॉइनमध्ये आठ पुणेकरांना चुना

Published On: Feb 26 2018 1:20AM | Last Updated: Feb 26 2018 1:20AMपुणे : अक्षय फाटक

जगातील बड्या हस्तींसह सर्वसामान्यांना भुरळ घालणार्‍या आभासी चलनाने (बिटकॉईन आणि क्रिप्टो करन्सी) पुणेकरांनाही फसवणुकीच्या जाळ्यात ओढले आहे. पुण्यातील पहिला गुन्हा दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आणखी आठ नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले असून, त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे धाव घेतली आहे. यात जवळपास एक कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारतासह जगभरात सध्या अभासी चलनाने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले जात आहे; त्यामुळे अनेकांकडून हा पर्याय निवडला जात आहे.  यातील गुंतवणूकदार उच्चशिक्षित आहेत. 

बिबवेवाडी भागात राहणार्‍या एका महिलेने आपल्या नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेऊन, सात लाख रुपये या आभासी चलनातील एजंटला दिले. त्याने महिलेला 20 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले; मात्र त्यानंतर त्याने जादा परतावा तर सोडाच; पण मूळ रक्कमही दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.