Sun, Jul 21, 2019 06:28होमपेज › Pune › लग्नाच्या अमिषाने तरुणीला तीन लाखांचा गंडा 

लग्नाच्या अमिषाने तरुणीला तीन लाखांचा गंडा 

Published On: Jun 20 2018 10:05AM | Last Updated: Jun 20 2018 10:05AMपिंपरी : प्रतिनिधी

शादी डॉट कॉम या वेब साईटवरील माहितीच्या आधारे तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तीन लाखांचा गंडा घातल्‍याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात रूद्रा थापा या तरूणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

शिल्पा राजेंद्र पशीने (वय, २९, रा. शंकर कलाटे नगर, वाकड) या तरुणीने फिर्याद दिली असून, त्यावरून रूद्रा थापर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूद्रा थापरने शादी डॉट कॉम या वेब साईटवरून शिल्पाची माहिती मिळवली. मला तुझी प्रोफाइल आवडली असून तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे अमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. काही दिवसानंतर पैशाची अडचण असल्याचे सांगून शिल्पाच्या पेटीएम आणि सिटी बँकच्या क्रेडिट कार्डचा वापर करून २ लाख ९४ हजार रूपये ट्रान्सफर करून घेतले. पैसे मिळाल्यानंतर रूद्रा थापरने मोबाईल बंद केला असल्याने  शिल्पाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.