Thu, Nov 15, 2018 22:13होमपेज › Pune › पिंपरीत चार दुचाकी पेटवल्या

पिंपरीत चार दुचाकी पेटवल्या

Published On: Jul 31 2018 10:27AM | Last Updated: Jul 31 2018 10:27AMपिंपरी : प्रतिनधी 

पिंपरीतील भाटनगर परिसरातील पत्राशेड येथे चार दुचाकी पेटवल्या. ही घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्राशेड, भाटनगर परिसरात आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षातून पोलिसांना मिळाली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होईपर्यंत चार दुचाकी जाळून खाक झाल्या होत्या. काही वेळाने दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. एका अल्पवयीन मुलाने खोडसाळपणा केला असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.