Mon, Nov 19, 2018 04:35होमपेज › Pune › महाराष्ट्राचे माजी रणजीपटू व कर्णधार राजू भालेकर यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी रणजीपटू व कर्णधार राजू भालेकर यांचे निधन

Published On: Apr 14 2018 5:19PM | Last Updated: Apr 14 2018 5:19PMपुणे  : प्रतिनिधी

महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू उर्फ राजेंद्र भालेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्यावर रात्री 9 च्या सुमारास नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.  त्यांच्या मृत्यू नंतर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजू भालेकर आजारी होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते सध्या रणजीच्या महाराष्ट्र संघाच्या निवडी समितीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. याव्यतिरिक्त पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे ते सचिव म्हणून कार्यरत होते. राजू भालेराव यांनी आपल्या रणजी सामन्यांच्या कारकीर्दीत 74 सामन्यांमधून तब्बल 3877 धावा केल्या. त्यामध्ये 18 वेळा अर्धशतक तर 7 शतके आहेत. नाबाद 207 धावांचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या जाणने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.