Tue, Mar 26, 2019 08:16



होमपेज › Pune › संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार : विखे-पाटील 

संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार : विखे-पाटील 

Published On: Feb 13 2018 8:25PM | Last Updated: Feb 13 2018 8:25PM



पुणे : प्रतिनिधी 

राज्य सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  केला आहे. मंगळवारी विखे-पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्य शासनाने अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून २० रूपयांना असलेली काही पुस्तके ५० रूपये किंमतीने खरेदी केली आहेत. याअंतर्गत एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी करण्यात आली असून, यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी यावेळी केला.