Sun, Jul 21, 2019 10:17होमपेज › Pune › पुणे : शेतकरी संपाचा पहिल्या दिवशी बाजारावर परिणाम नाही (Video)

पुणे : शेतकरी संपाचा पहिल्या दिवशी बाजारावर परिणाम नाही (Video)

Published On: Jun 01 2018 11:48AM | Last Updated: Jun 01 2018 11:59AMपुणे : प्रतिनिधी

शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती मिळावी, उसाची एफआरपीची रक्कम मिळावी , शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपास शुक्रवारपासून सुरुवात झाली. संपाच्या पहिल्या दिवशी पुणे मार्केट यार्डात कोणताही परिणाम जाणवला नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्था होण्यासाठीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांना आडत्याचा  पाठिंबा आहे. केंद्र व राज्यसरकारने त्यांचे प्रश्न सोडवावेत. शुक्रवारी स्थानिक तसेच परराज्यातील शेतमालाची नियमित आवक झालेली असून बाजारभाव स्थिर आहेत. 

 

शनिवारी बाजारास साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या शेतमालाची  आवक  किती होते, त्यानुसार संपाची तीव्रता जाणवेल.