Tue, Nov 19, 2019 10:06होमपेज › Pune › कळसकर, अंदुरेकडून दाभोलकरांवर गोळीबार

कळसकर, अंदुरेकडून दाभोलकरांवर गोळीबार

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:45AM
पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तेव्हा चाचणीत 'मी आणि साथीदार सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला' अशी माहिती कळसकरने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली. 

फेब्रुवारी 2019 मध्ये ‘सीबीआय’कडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. ‘सीबीआय’चे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.‘सीबीआय’कडून याबाबत मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. 

त्यात कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली असून या चाचणीत 'मी आणि अंदुरे याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला' अशी माहिती कळसकरने दिली आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी ‘सीबीआय’ने अटक केली  होती. गेल्या वर्षी जून महिन्यात मी अ‍ॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत ‘सीबीआय’ला सांगितले होते.