Wed, Jan 23, 2019 23:17होमपेज › Pune › पुणे : मनपाचा कचरा प्रकल्प आगीत भस्मात

पुणे : मनपाचा कचरा प्रकल्प आगीत भस्मात

Published On: Mar 07 2018 8:24PM | Last Updated: Mar 07 2018 8:24PMपुणे प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या हडपसर येथील वीज निर्मिती कचरा प्रकल्पाला बुधवारी दुपारी भिषण आग लागली. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आगीत प्रकल्पीतील मशनरी तसेच इतर साहित्य आणि कचरा जळून खाक झाला आहे. जीसीबीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. अग्निशामक दलाने वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. परिसरात मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. 

पुणे महापालिकेचा रामटेकडी परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे.  या ठिकाणी गोळा करण्यात आलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठीचा प्रकल्‍प सुरु करण्यात आला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथे वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी वीज निर्मितीसाठी लागणार्‍या मोठ्या मशनरी आहेत. या प्रकल्‍पात शहरातील विविध भागातून सुका कचरा गोळाकरून आणला जातो.