Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘द्रुतगती’वर टेम्पोला आग; वाहतूक विस्कळीत

‘द्रुतगती’वर टेम्पोला आग; वाहतूक विस्कळीत

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:21AMलोणावळा : वार्ताहर 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा शहर हद्दीत किरकोळ सामान घेऊन जाणार्‍या एका टेम्पोस अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 21) घडली. त्यामुळे या मार्गावरून मुंबईहून  पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर  किलोमीटर क्र. 50, कुनेगाव पुलाजवळ अ‍ॅॅसिडचे कॅन, कागद आणि इतर किरकोळ सामान पुण्याच्या दिशेने घेऊन जाणार्‍या टेम्पोला (एमएच 46 एफ.2344) अचानक आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच ‘आयआरबी’च्या अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.  त्यांनी टेम्पोस लागलेली आग विझवली. काही काळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान आग विझल्यावर टेम्पोमधील सर्व समान खाली काढण्यात आले. या आगीत टेम्पोसह आतील सामानाचे नुकसान झाले.