Sun, Mar 24, 2019 08:21होमपेज › Pune › पुणेः स्टील कारखान्यात स्फोट, ४ जण गंभीर जखमी

पुणेः स्टील कारखान्यात स्फोट, ४ जण गंभीर जखमी

Published On: Jan 31 2018 10:57AM | Last Updated: Jan 31 2018 11:34AMयवतः वार्ताहर 

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे स्टील उत्पादक मिनाक्षी कंपनीच्या कारखान्यात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन ४ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. 

लोखंडाचा रस बकेटमधून क्रेनच्या साह्याने वाहून नेला जात असताना क्रेन तुटल्याने बकेटमध्ये असलेला लोखंडाचा रस कंपनीत काम करणाऱ्या कामगार  १) संतोष कुमार २) रमेश पाक ३) रामप्रसाद तिची ४) अबुजार कलीम खान यांच्या अंगावर पडल्याने भाजून ते जखमी झाले. जखमींना कडेगाव व लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

यापैकी रामप्रसाद आणि अबुजार यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडेगाव येथील साईदर्शन हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. कंपनीतील वितळलेल्या लोखंडामुळे लागलेली आग अग्नीशामक दलाने नियंत्रणात आणली. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.