Sat, Aug 24, 2019 12:22होमपेज › Pune › पुणे : एटीएम सेंटरला आग (VIDEO)

पुणे : एटीएम सेंटरला आग (VIDEO)

Published On: Dec 01 2017 1:45PM | Last Updated: Dec 01 2017 1:50PM

बुकमार्क करा

पुणे : पुढारी ऑनालाईन

पुण्यातील वारजे येथे गुरूवारी इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि एटीएम सेंटरला आग लागली होती. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर  ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. 

वारजे परिसरात एक इलेक्ट्रॉनिक दुकान आणि एटीएम सेंटर आहे. आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काहीच क्षणात एटीएम सेंटरही आगीच्या भक्षस्थानी सापडले. शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या एटीएममध्ये गुरूवारीच कॅश भरण्यात आली होती. या आगीत ही सर्व रक्कम जळून खाक झाली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थली दाखल झाल्या होत्या. जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.