Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Pune › पुणे : आदिवासींची सात घरे भस्मसात

पुणे : आदिवासींची सात घरे भस्मसात

Published On: May 18 2018 12:47PM | Last Updated: May 18 2018 12:38PMनिमोणे : वार्ताहर

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे सात आदिवासींची घरे आगीत भस्मसात झाली आहेत. सद्य परिस्थितीत मासेमारीचा हंगाम सुरू असल्याने या आगीत मोठ्या प्रमाणात मासेमारीचे साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत नुकसान झाल्याने आदिवासी बांधवांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान आमदार बाबुराव पाचर्णे  यांनी घटनास्थळाला तातडीने भेट देऊन आगीत नुकसान झालेल्यांना पाच हजाराची तातडीची मदत केली आहे.