Fri, Apr 19, 2019 12:24होमपेज › Pune › पुणे : देवाची उरळी येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : देवाची उरळी येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

Published On: Dec 20 2017 8:54AM | Last Updated: Dec 20 2017 8:54AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील देवाची उरळीजवळ मंतरवाडी भागात एका प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगिमंध्ये दोन चारचाकी व दोन दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या. आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

दरम्यान अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, दोन वॉटर ब्राऊझर व खासगी वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आण्यात यश आले. पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आगीचे नेमके कारण समजले नाही. अद्यापही अग्निशामककडून कुलिंगचे काम सुरु आहे.