Sun, Feb 17, 2019 19:13होमपेज › Pune › माजी नगरसेवकाची एकाला मारहाण; गुन्हा दाखल  

माजी नगरसेवकाची एकाला मारहाण; गुन्हा दाखल  

Published On: Mar 03 2018 1:46PM | Last Updated: Mar 03 2018 1:46PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकाला चिंचवड़ येथे मारहाण केली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सागर रमेश कोंडे (42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ  थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्‍यात मारहाण केली. अनंत कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तपास चिंचवड़ पोलिस करीत आहेत.