Wed, Jul 17, 2019 18:25होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचा पाचवा बळी

स्वाइन फ्लूचा पाचवा बळी

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील 56 वर्षीय वृध्दाचा स्वाइन फ्लूने उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात स्वाइन फ्लूचा या वर्षातला पाचवा बळी आहे. आकुर्डी येथील खासगी रुग्णालयात संबंधित रुग्णावर उपचार सुरू होते. शहरात अद्यापपर्यंत 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

या वृध्द रुग्णाला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 ऑगस्ट रोजी त्रास होऊ लागल्यामुळे या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. दरम्यान स्वाइन फ्लू झाला असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्‍त झाला. उपचार सुरू असताना संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी 20 संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. एकूण 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.