Tue, Nov 20, 2018 01:34होमपेज › Pune › मीटर बॉक्सला लागलेल्या आगीत तीन दुचाकी खाक

मीटर बॉक्सला लागलेल्या आगीत तीन दुचाकी खाक

Published On: Jun 30 2018 8:00AM | Last Updated: Jun 30 2018 8:00AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा भागात मीटर बॉक्समध्ये लागलेल्या आगीत तीन दुचाकी जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. 

दरम्यान नेमकी आग का लागली हे समजू शकले नसून, शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता अग्निशामक दलाने वर्तवली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.