Thu, Apr 25, 2019 22:13होमपेज › Pune › यंदा मुहूर्त कमी; विवाहेच्छुकांची ‘बुकींग’साठी घाई

यंदा मुहूर्त कमी; विवाहेच्छुकांची ‘बुकींग’साठी घाई

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 09 2018 12:39AMपिंपरी ः प्रतिनिधी

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असून, या वर्षी लग्नासाठी अनेक विवाहेच्छुक लग्नासाठी तयारी करत आहेत; मात्र चातुर्मास व अधिक मासामुळे 15 जुलै ते 1 डिसेंबरपर्यंत म्हणजे पाच महिने लग्नमुहूर्तच नसल्याने विवाहेच्छुकांनी लग्नासाठी घाई सुरू केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळपास वीस ते बावीस लग्नमुहूर्त कमी असून, या वर्षी केवळ 52 लग्नमुहूर्त असल्याने अनेकांना विवाहासाठी घाई न केल्यास वाट पाहावी लागणार आहे. 

2018 या वर्षातील लग्नमुहूर्त

फेब्रुवारी महिन्यात 9, 11, 18, 19, 20,21,24 या तारखांना, तर मार्चमध्ये 3, 4, 5, 6, 12, 13, 14, एप्रिल महिन्यात 19, 20, 24, 25, 26, 27, 28, 30, मेमध्ये 1, 2, 4, 6, 7, 8, 9, 11, 12, जून महिन्यात 18, 23, 28, 29, जुलैमध्ये   2, 5, 6, 7, 10, 15, तर डिसेंबरमध्ये 2, 13, 17, 18, 22, 26, 28, 29, 30, 31. 

या वर्षी विवाहमुहूर्त कमी असल्याने विवाहेच्छुकांना व विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे; कारण मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठीण झाले असून, जवळपास सर्वच ठिकाणी हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉलची पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी दमछाक होत आहे. या वर्षात केवळ 52 विवाहमुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाहमुहूर्त हे कमी असून, या वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास 16 मे ते 13 जूनदरम्यान असून, या महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे अनेकांना विवाहासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे.या कालावधीतही कुठलाही शुभमुहूर्त नसल्याने शुभकार्य वर्ज्य असल्याने लग्नतिथी नाहीत. यामुळे उपवर वधू-वर पित्यांची सध्या लग्न जुळवाजुळव करण्यापासून ते लग्नमुहूर्त साधण्यासाठी तारांबळ उडत आहे.