Wed, Sep 19, 2018 20:34



होमपेज › Pune › पुणे : जावयाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू

पुणे : जावयाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू

Published On: Jan 19 2018 1:22PM | Last Updated: Jan 19 2018 1:22PM



पुणे : प्रतिनिधी

पुण्यातल्या हडपसर भागात जावयाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला.उत्तम जाधव असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर जावई राजेंद्र शिंदे हा फरार झाला आहे. 

याप्रकरणी जावई राजेंद्र शिंदे याच्या विरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून कलम वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आरोपी राजेंद्र शिंदे व्यसनी होता. तो सासरे जाधव यांच्याकडे पैसे मागत असे. मात्र, जाधव यांनी व्यसनामुळे त्याला पैसे दिले नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाडंण झाले होते. त्यात त्यानें जाधव यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने जाधव यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.