Mon, Apr 22, 2019 04:29होमपेज › Pune › स्व:ताच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक

स्व:ताच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक

Published On: Apr 10 2018 8:56PM | Last Updated: Apr 10 2018 8:56PMपुणे : प्रतिनिधी

पोटच्या स्व:ताच्याच १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक करण्यात आली आहे. माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना धायरी, पुणे येथे घटली आहे. याप्रकरणी नराधम सुहास नामदेव सिंडगीधी (वय ५२ रा. लायगुडे बील्डींग, धायरी, पुणे) यास सिंहगड पोलीसांनी जेरबंद केले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुहास सिंडगीधी याचा टेलरींगचा व्यवसाय आहे. त्याच्या पत्नीचे ४ वर्षापुर्वी निधन झाले आहे. तो आपल्या ३ मुलींसमवेत राहत होता. त्यापैकी दोन मुलींची लग्न झाली आहेत. तर सध्या तो १६ वर्षांची असलेल्या आपल्या लहान मुली सोबत राहत होता.

सिंडगीधी याचे घरात असभ्य वर्तन होते. तो घरी लहान मुलगी असताना देखील नग्न अवस्थेत वावरत होता. तर आपली वासना भागवण्यासाठी तो स्वताच्या १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करायचा. ही बाब या मुलीने आपल्या शेजारी राहत असलेल्या संबंधितास सांगितली. शेजाऱ्यांनी या मुलीस विश्वासात घेत पोलिस ठाण्यात धाव घेत हा सविस्तर प्रकार सांगितला.  यांची माहिती होताच नराधम सिंडगीधी याने घरातून पलायन केले. पोलिसांनी यासंबंधीची तक्रार नोंदवत सिंडगीधी यास अटक केली. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा अधिक तपास सिंहगड पोलिस करीत आहेत. 

 

Tags : pune, pune news, crime, rap case, father arrested,