होमपेज › Pune › पुणे : दुधाने आंघोळ करुन आंदोलन (Video)

पुणे : दुधाने आंघोळ करुन आंदोलन (Video)

Published On: Jul 17 2018 2:39PM | Last Updated: Jul 17 2018 2:39PMउंडवडी : वार्ताहर : 

दुधाला दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आज दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यातील  बारामती तालुक्यातील उंडवडी येथील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांनी भर रस्त्यातच दुधाने आंघोळ केली. यावेळी दुध दरवाढीची मागणी करत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. 

उंडवडी सुपे येथे सरकारचा निषेध करत रस्त्यावरच शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ केली. जोपर्यंत सरकार दुधाला भाव देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्यभर सुरु असलेल्या या आंदोलनात दुधाची वाहतूक करणारे टँकर अडवण्यात आले. तसेच काही टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून सरकारविरोधात आंदोलन केले.