Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Pune › पुणे : शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

पुणे : शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Published On: Jun 01 2018 12:58PM | Last Updated: Jun 01 2018 12:58PMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारने फसवणूक केल्यामुळे वतीने दि. १ ते १० जूनदरम्यान शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. याच अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवदेन दिले.

शेतकरी संघटना, भूमाता ब्रिगेड, प्रहार संघटना, किसान सभा, मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दुधाला सरकारने ठरवून दिलेल्या २७ रुपये दर मागील ८ महिन्याची दुधदर फरकाची रक्कम मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सर्व शेतमालाला दिडपट हमी भाव जाहिर करावा व सरकारने सर्व शेतमाल पणन मार्फत खरेदी करण्यात यावी. शेतकर्‍यांवरील कर्ज आणि विजबील सरसकट माफ करावे. शेतकरी विरोधी जेवढे कायदे आहेत, ते रद्द करून त्यातून शेतकर्‍यांची मुक्तता करावी. याप्रमुख मागण्यासंह शेतकर्‍यांना पाच हजार रुपये पेन्शन योजना लागू करण्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दुधाच्या संदर्भात तातडीने बैठक घेणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार म्हणाले, शेतकर्‍यांनी दिवसभरात निर्णय घेतला नाही तर आंदोनलाचा तिढा १० जून पर्यंत कायम राहिल. संपुर्ण शहराची सर्व रसद बंद केली जाईल, याला सरकार जबाबदार राहिल. यावेळी प्रदेश सचिव नंदा जाधव, नाथा शिंगाडे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, आदी उपस्थित होते.