Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Pune › दोन ते तीन शेतकर्‍यांना आता मिळणार एक रोहित्र

दोन ते तीन शेतकर्‍यांना आता मिळणार एक रोहित्र

Published On: Jun 15 2018 1:24AM | Last Updated: Jun 15 2018 1:20AMपुणे : शिवाजी शिंदे 

महावितरण वीज कंपनीकडून मागील काही वर्षापासून पारंपरिक पध्दतीने 65 ते 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रामधून 15 ते 20 शेतकर्‍यांना एकत्रित करून विद्युत पुरवठा करण्यात येत होता. आता मात्र त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काळात दोन ते तीन शेतकर्‍यांसाठी एक रोहित्र, अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे  शेतकर्‍यांना अंखडित वीज पुरवठा होणार आहेच, शिवाय वीज चोरीलाही आळा बसणार आहे. 

राज्यातील ग्रामीण भागात कृषीपंप चालविण्यासाठी वीजेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. वीज पुरवठा करताना वारंवार वाहिन्यामध्ये बिघाड होऊन, वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, रोहित्रामध्ये बिघाड होणे, त्याचप्रमाणे अपघाता सारखे प्रकार होत असत. परिणामी महावितरण वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊनच आता शेतकर्‍यांसाठी  ही योजना राज्य शासनाने राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज कनेकशन देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे दोन ते तीन शेतकर्‍यांना एकत्र करून, त्यांना रोहित्र देण्यात येणार आहे. या प्रणालीस ‘एचव्हीडीएस’ प्रणाली किंवा योजना असे  नामकरण करण्यात आले आहे.

या योजनेसाठी राज्य शासनाने 6 हजार 496 कोटी 96 लाख, तसेच नवीन उपकेंद्रासाठी लागणारा खर्च अंदाजे 551 कोटी 44 लाख रूपये असे एकूण 5 हजार 48 कोटी 13 लाख रूपये इतक्या निधीची व्यावस्था केली आहे.