Fri, Jul 10, 2020 22:00होमपेज › Pune › बनावट शाम्पू विकणारी टोळी अटकेत 

बनावट शाम्पू विकणारी टोळी अटकेत 

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:20AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट शॅम्पू विकणार्‍या उत्तर प्रदेशमधील टोळीला पुणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि औषध व अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे दीड लाखाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी, वल्लभनगर येेथे करण्यात आली. 

निजामुद्दीन बशीरखान उस्मानी (30), इस्लाम गफूर खान अली सय्यद (19), इसाक खान शमशुद्दीन लोधी (23), नाझीम नूर हसन तेली (25, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. मागील महिन्यात बनावट शॅम्पू व सौंदर्यप्रसाधने विकणारी टोळी मोठ्या मुद्देमालासह मुंबईमध्येही अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित कंपनीच्या नावाखाली वल्लभनगर येथून या टोळीचा व्यवहार चालत होता. याची माहिती मिळताच सापळा रचत पोलिसांनी चौघांना अटक केली. यामध्ये लोरीयल, सनसिल्क, हेड अँड शोल्डर्स, क्लिनिक प्लस, ट्रेसमी, हिमालया, पॅन्टीन, बाबा रामदेवांचा पतंजली शॅम्पूचीही नक्कल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत बनावट शॅम्पूच्या एक लाख 53 हजार रुपयांच्या सुमारे 842 बॉटल्स जप्त करण्यात आल्या. तपास पोलिस करीत आहेत.