Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Pune › पुणे : दत्तवाडी सराईत गुन्हेगारावर गोळीबार

पुणे : दत्तवाडी सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Published On: Jun 25 2018 9:36AM | Last Updated: Jun 25 2018 9:36AMपुणे : प्रतिनिधी

वाढदिवस साजरा करताना एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दत्तवाडीत सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. सुरज उर्फ सुराज्या यशवद (वय, 30) असे गोळीबार झालेल्‍या गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी रोहित उटाडा, अक्षय मारणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबारात सुरज हा गंभीर जखमी झाला असून, त्‍याला उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुरजवर गोळीबार करून त्‍याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकाराबात दत्तवाडी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरु आहे.