Mon, May 20, 2019 22:29होमपेज › Pune › पुणे : आरटीओ कार्यालयात भीषण आग 

पुणे : आरटीओ कार्यालयात भीषण आग 

Published On: Jun 19 2018 10:09AM | Last Updated: Jun 19 2018 10:09AMपुणे : प्रतिनिधी

संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली असून, आगीत काही कागदपत्रे जळाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दहा ते पंधरा मिनीटात आगीवर नियंत्रन मिळवन्यात यश आले आहे.

आरटीओ कार्यालयाची दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कागदपत्रांच्या गठ्ठ्यामध्ये आग लागल्याचे तेथील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आरटीओशी संबंधित कागदपत्र होते. त्यातील काही आगीच्या भक्षस्थानी सापडली. 

दरम्‍यान, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.