Mon, Sep 24, 2018 09:05होमपेज › Pune › पुणे : इंजिनिअरची गोळी झाडून आत्महत्या 

पुणे : इंजिनिअरची गोळी झाडून आत्महत्या 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

राहत्या घरात वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडून घेत एका वरिष्ठ इंजिनिअरने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला.

आनंद बळवंत वासुदेव यादव (35, रा. ए 2, 503, रिदम सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो एनव्हीआयडीए या कंपनीत कामाला होता. आनंद याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने  माझ्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरु नये असे नमूद केले आहे. ज्या पिस्तुलाचा वापर आत्महत्या करण्यासाठी झाला त्या पिस्तुलाचा परवाना आहे का नाही याचा तपास वाकड पोलिस करत आहेत. 
 

tags : pune, pune news, suicide, engineer suicide, 


  •