Fri, Jul 19, 2019 01:04होमपेज › Pune › एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:29AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांसह कबीर मंचच्या काही जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तुषार रमेश दामगुडे (वय ३७, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कलामंचचे सुधीर ढवळे, सागर गोरखे, हर्षाली पोतदार, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा प्रांगणात गेल्या दि. ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फेसबुकवर पाहिलेल्या एल्गार परिषदेची पोस्ट वाचून मी शनिवारवाडा येथे गेलो होतो. यावेळी कबीर कलामंचचे सुधीर ढवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चिथावणी खोर भाषणे केली. या भाषणांमुळे आणि घोषणाबाजीमुळे समाजात तेढ निर्माण होऊन पुढील घटना घ़डल्या.त्यामुळे या सरकारविरोधात माझी तक्रार आहे,  दामगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत मराठे पुढील तपास करत आहेत. या परिषदेला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी व विद्यार्थी नेता उमर खालीद हे उपस्थित होते. त्यांच्यावर यापुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.