Mon, Nov 19, 2018 00:29होमपेज › Pune › माऊलींच्या अश्वाची दगडूशेठच्या बाप्पाला मानवंदना(व्हिडिओ)

माऊलींच्या अश्वाची दगडूशेठच्या बाप्पाला मानवंदना(व्हिडिओ)

Published On: Jul 04 2018 11:02PM | Last Updated: Jul 04 2018 11:02PMपुणे : प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या अश्वाने पालखी सोहळ्याला प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक भाविकांनी बाप्पासोबतच अश्वाचे देखील दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत ज्ञानेश्वर महाराज रिंगण सोहळ्यात धावणाऱ्या अश्वांने दर्शन घेतले. यावेळी उर्जितसिंह शितोळे सरकार ( अंकालीकर), महादजीराजे शितोळे सरकार ( अंकालीकर), श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सूनील रासणे, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी व अन्य उपस्थित होते.