Thu, Feb 21, 2019 11:13होमपेज › Pune › बनावट आधार कार्ड बनवणार्याला कोठडी

बनावट आधार कार्ड बनवणार्याला कोठडी

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:13AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या व्यक्तींना भेटण्यास जाण्यासाठी दोघांना बनावट आधार कार्ड बनवून देणार्याला पोलिसांनी अटक केली. त्याला 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली असून, ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत. 

आदित्य राम हुले (वय 22, रा. थेरगाव) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी ओंकार राजू चौधरी (वय 21) आणि आकाश अनिल पोटघन (वय 23, दोघेही, रा. चिंचवड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत. याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील जेलरक्षक छाया तांबे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12 या दरम्यान घडली. ओंकार आणि आकाश बनावट आधार कार्डद्वारे येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या दोन व्यक्तींना भेटायला गेले होते. बंदीचे व्यक्तीच्या भावाच्या नावाने बनावट आधार कार्ड घेऊन ते दोघे गेले होते. मात्र, ही बाब येरवडा कारागृहातील कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी ओंकार आणि आकाश या दोघांना अटक केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.