Fri, May 24, 2019 06:52होमपेज › Pune › 'चक्कर अाली म्हणून, डीएसके खाली बसले'

'चक्कर अाली म्हणून, डीएसके खाली बसले'

Published On: Feb 18 2018 10:15AM | Last Updated: Feb 18 2018 10:15AMपुणे : प्रतिनिधी

न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्यात रवानगी केल्यानंतर रात्री दहा वाजता मध्यवस्तीतील विश्रामबाग कोठडीत आणण्यात आले. यावेळी त्यांना अचानक रात्री बारा वाजता चक्कर आली आणि ते खाली बसले. त्यामुळे डीएकसे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान डीएसके यांनी पोलिसांनी दिलेले जेवणही नाकरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

डीएसके यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांनतर आर्थिक गुन्हे शाखेने रात्री दहा वाजता डी. एस. कुलकर्णी व पत्नी हेमंती कुलकर्णी याना पुणे पोलिसांच्या सर्वात मोठे लॉकअप असणाऱ्या मध्यवस्तीतील विश्रामबाग कारागृहात आणण्यात आले. त्यानंतर काही वेळाने येथील कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यानी त्यांना इतर कैद्यांप्रमाणे जेवण दिले. परंतु, त्यांनी हे जेवण नाकारले. काही वेळ गेल्यानंतर डीएसके अचानक खाली बसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी चक्कर आल्याने बसल्याचे सांगितले. तातडीने त्यांना सव्वा बारा वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डीएसके यांच्या ससून रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत आहेत, असे सांगण्यात येत आहे.