होमपेज › Pune › पोलिस कोठडीत पडल्याने डीएसकेंवर ICUमध्ये उपचार

पोलिस कोठडीत पडल्याने डीएसकेंवर ICUमध्ये उपचार

Published On: Feb 18 2018 8:07AM | Last Updated: Feb 18 2018 8:07AMपुणे : प्रतिनिधी

पोलिस कोठडीत तोल जाऊन पडल्याच्या संशयावरून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ब्रेन हॅमरेज झाल्याचे माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तात्काळ त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या.

यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ठेवीदरांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डीएसके यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांनतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. मात्र मध्यरात्री तीन वाजता डीएसके यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोठडीत तोल जाऊन पडल्याचा संशय व्‍यक्‍त करण्यात आला होता. त्यातच त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.  सिटी स्कॅन व एमआरआय करण्यात आले. त्यात ब्रेन हॅमरेज झाले नसल्याचे समोर आले. सध्या डीएसके यांच्यावर ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.