Wed, Sep 19, 2018 09:09होमपेज › Pune › डीएसके घोटाळा : रविंद्र मराठे ससूनमध्ये अ‍ॅडमिट

डीएसके घोटाळा : रविंद्र मराठे ससूनमध्ये अ‍ॅडमिट

Published On: Jun 21 2018 11:18AM | Last Updated: Jun 21 2018 11:18AMपुणे : प्रतिनिधी
डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, डी. एस. कुलकर्णी यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीचे उपाध्यक्ष राजीव नेवासकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे, बँकेचे माजी अध्यक्ष सुशील मुहनोत यांना अटक करण्यात आली. रविंद्र मराठे व इतरांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. रात्री त्यांनी जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.