पुणे : पुढारी ऑनलाईन
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सरकारी पक्षाच्या वकीलांनी ४७० कोटी रुपयांच्या दस्ताऐवजात घोटाळा केल्याचा युक्तिवाद केला. डीएसकेनी ११ गृहप्रकल्प कार्यान्वित करून ७० फ्लॅटचे बुकिंग घेतले होते. ७० फ्लॅटच्या बुकिंगमधून ४७० कोटी जमा करून १७० कोटी रुपये बांधकामासाठी खर्च केले तर ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केला.
डीएसके यांच्यावर गुरूवारी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. डीएसकेनी पब्लिक प्रा. लि. नावाने कंपन्या उभा केला. यामध्ये कंपनीच्या भागधारकांकडून पैशांची उभारणी केली. यामध्ये त्यांनी भागधारकांचा पैसा वैयक्तिक कामासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापरला. डीएसकेनी या कंपनीच्या आधारावर तीन हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील या घोटाळ्याप्रमाणेचे कोल्हापूर, मुंबईतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.