Mon, Nov 19, 2018 11:09होमपेज › Pune › डीएसके घोटाळा : महाराष्ट्र बँकेच्या माजी अध्यक्षाला २७ पर्यंत कोठडी

महाराष्ट्र बँकेच्या माजी अध्यक्षाला २७ पर्यंत कोठडी

Published On: Jun 22 2018 2:24PM | Last Updated: Jun 22 2018 2:24PMपुणे : प्रतिनिधी

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असणार्‍या डीएसकेंच्या कंपनीला गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांना अहमदाबाद अटक करून प्रवासी कोठडीद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.  यावेळी त्यांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. 

विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे यांना जयपूर येथून अटक करून प्रवासी कोठडीद्वारे गुरुवारी  न्यायालयात हजर केले होते. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभाकर मराठे, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे सनदी लेखापाल सुनिल मधुकर घाटपांडे आणि डीएस कुलकर्णी डेव्हलपर्सचे मुख्य अभियंता तसेच उपाध्यक्ष राजीव दुल्लभदास नेवासकर या चौघांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  यावेळी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद केला तर बचाव पक्षाच्यावतीने ॲड. सचिन ठोंबरे, ॲड. शैलेश म्हस्के यांनी विरोध केला.