Wed, Nov 14, 2018 18:46होमपेज › Pune › पुणे : आलिशान बसमधून २५ लाखांचा गुटखा जप्त

पुणे : आलिशान बसमधून २५ लाखांचा गुटखा जप्त

Published On: Mar 16 2018 6:37PM | Last Updated: Mar 16 2018 6:37PMपिंपरी : प्रतिनिधी

बेकायदेशीरपणे पुण्यात आलिशान बसमधून आणलेला २५ लाखांचा गुटखा अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांनी जप्त केला आहे. २५ लाखांचा गुटखा; तसेच ८० लाख रुपये किमतीच्या दोन आलिशान बसगाड्या पकडण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी गुटखा माफिया श्रीकांत चांदेकर आणि राजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. यूपी ७५ एटी ४६७७ आणि यूपी ७५ एटी ४६७८ या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या. 

बुधवारी रात्री आठपासून या कारवाईसाठी सापळा लावण्यात आला होता. ही कारवाई एफएसओ अधिकारी संतोष जाधव, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त नरगुडे, संजय दळवी यांच्या टीमने केली. जप्त करण्यात आलेला सर्व माल निगडी पोलिस चौकीमध्ये ठेवण्यात आला आहे.