Thu, Jun 27, 2019 18:04होमपेज › Pune › लोहगडावरील तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू

लोहगडावरील तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:25AM

बुकमार्क करा
पवनानगर  : वार्ताहर 

लोहगड किल्ल्यावरील महादेव मंदिराशेजारील अष्टकोनी तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 9) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.  जुबेर अकबर शेख (वय 20, रा. खडकी बाजार, पुणे) असे  मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावरील दर्ग्यावर दर्शनासाठी पुणे येथून मंगळवारी सकाळी एका कुटुंबातील 17 जण आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास जुबेर शेख अष्टकोनी तलावात हात-पाय धुण्यासाठी उतरला होता. त्या वेळी तोल जाऊन पाण्यात पडला.  त्याच्या सोबत असणार्या लहान मुलांनी आरडओरडा सुरू केला.  घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना  गडाच्या सुरक्षा रक्षकांना दिली.  सुरक्षका रक्षकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना त्यात अपयश आले.  सुरक्षा रक्षकांनी  लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.  पोलिस आणि शिवदुर्ग पथकाने शोधकार्य सुरू केले. दोन-तीन तासांच्या शोधकार्यानंतर सायंकाळी 5 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला.  घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.  लोणावळा ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत.