Mon, Aug 19, 2019 01:11होमपेज › Pune › 'जवाब दो', पुण्यात एल्गार: फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर

'जवाब दो', पुण्यात एल्गार: फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर

Published On: Aug 20 2018 7:56AM | Last Updated: Aug 20 2018 10:10AMपुणे : प्रतिनिधी

 डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून आज सकाळी रॅली काढण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर, जवाब दो, जवाब दो, सरकार जवाब दो. विवेकाचा आवाज बुलंद करूया, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या रॅलीत डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,  मेधा पानसरे, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे आदी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग उल्लेखनीय होता. सकाळी शिंदे पुलावर गीतांमधून दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. आज दिवसभर साने गुरुजी स्मारक येथे विवेकवादी विचारांचा जागर करण्यात येणार असून, अभिनेते प्रकाश राज, जेष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर चर्चा सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.

डॉ. दाभोलकरांचे छायाचित्र तसेच घोषणांचे फलक हातात घेतलेले सर्वजण जवाब दो म्हणत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून लक्ष्मी रस्ता, अलका चौक, शास्त्री रस्त्याने रॅली सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे पोहचले.

संबंधित बातम्या: महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले अंदुरेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण

पाच वर्षापूर्वी...शांततेच्या आभाळात ‘ठोऽऽ’ आवाज आला

दाभोलकर, ‘त्यांना’ माफ  करायचं नाही...

दाभोलकरांनी काय घोडं मारलं होतं अंदुरे आणि कळसकराचं?