Sat, Apr 04, 2020 17:45होमपेज › Pune › शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट, वेळेच्या बंधनाचे काय?

शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट, वेळेच्या बंधनाचे काय?

Last Updated: Feb 19 2020 1:40AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा
गरीब व गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.  थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली. मात्र, शिवभोजन भोजनालयातून दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत दहा रुपयांत जेवन दिले जाते. त्यानंतर जेवन दिल्यास त्याचे अनुदान दिले जात नाही. त्यामुळे थाळींची संख्या दुप्पट करूनही वेळ कायम ठेवल्याने थाळी उपलब्ध असूनही, नागरिकांना दहा रुपयांत जेवन मिळेल की नाही, या विषयी शंका आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात शिवभोजन थाळींची संख्या निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र, सर्वच ठिकाणी असलेली मागणी लक्षात घेऊन संख्या दुप्पट करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या 1 जानेवारीच्या निर्णयानुसार दिलेल्या अटी व शर्ती विचारात घेऊन या योजेनचा विस्तार करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयाकडून अभिप्राय (फीडबॅक) मागविण्यात आला. सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी कमीत-कमी 75 तर जास्तीत- जास्त 150 थाळीचे उद्दिष्ट वाढून 75 ते 200 थाळी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

योजनेच्या पहिल्या टप्पात विशेषत: केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच कार्यान्वित राहणार आहेत. 

राज्यात पहिल्या टप्प्यात थाळीची संख्या 18 हजार होती, ती आता  36 हजार करण्यात आली. पुणे शहरासाठी एक हजार थाळींची मर्यादा होती, ती आता दोन हजार करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक हजार थाळी करण्यात आली आहे. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 11 शिवभोजन केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी 10 सुरू आहेत. शिवभोजनाची संख्या आणि वेळ कायम ठेवण्यात आली आहे. थाळींची संख्या वाढल्याने त्याचा कितपत लाभ नागरिकांना होईल, यावर शंका निर्माण होत आहे.