Mon, Mar 25, 2019 03:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › घरफोड्यांनी रोकड लुटली अन् ४५ हजारांचे कुत्र्याचे पिल्लूही नेले!

घरफोड्यांनी रोकड लुटली अन् ४५ हजारांचे कुत्र्याचे पिल्लूही नेले!

Published On: May 05 2018 1:21AM | Last Updated: May 05 2018 12:59AMपुणे : अक्षय फाटक

आतापर्यंत पुण्यातील चोरटे केवळ सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमच लुटत होते. मात्र, कोथरूडमधील मयूर कॉलनीतील रोहित निघोट (रा. शिवणे) यांच्या नील पेट केअर दुकानातून किंमती ऐवजाबरोबरच ‘यॉर्कशायर टेरियर’ जातीचे इम्पोर्टेड कुत्र्याचे पिल्लूही चोरून नेले. 

निघोट यांच्या मित्राने  ‘यॉर्कशायर टेरियर’ जातीच्या कुत्र्याचे पिल्लू विक्रीसाठी दिले होते. बुधवारी ते पिल्लू दुकानातच ठेवले होते. दरम्यान, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून 59 हजारांची रोकड लुटली व जाताना सोबत पिल्लूही चोरून  नेले. निघोट हे गुरुवारी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असताना हा प्रकार उघडकीस आला. 

45 हजारांचे पिल्लू

भारतात ‘यॉर्कशायर टेरियर’  या जातीच्या कुत्र्याची किंमत जवळपास 45 ते 65 हजारापयर्र्ंत आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला दीड लाखांपयर्र्ंत किंमत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी फिर्यादीत कुत्र्याच्या पिल्लाची किंमत फक्त चार हजार रुपये लावली आहे. परिसरातील सीसीटीव्हीत कुत्र्याचे पिल्लू चोरणारे चोरटे कैद झाले आहेत.